कसाबच्या शिक्षेच्या निमित्ताने काँग्रेस भाजपापेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम आहे हेच सिद्ध झाले आहे.
काँग्रेसच्या कारकीर्दीत कसाबचा हल्ला झाला. एका परदेशी नागरिकाने केलेल्या हल्ल्याची पूर्ण चौकशी, शिक्षा आणि प्रत्यक्ष फाशी हे सगळं काँग्रेस सरकारने ४ वर्षात पूर्ण करून प्रकरण संपवलेदेखील.
आणि हे भाजप सरकार! १९९९ ते २००४ हे संसदेत होते. २००१ साली यांच्या बुडाखाली संसदेत अफजलगुरुने- एका भारतीय माणसाने बाँब टाकला. पुढचे तीन वर्षे हेच भाजपावाले सत्तेत होते. पण यांच्या कारकीर्दीत ना तपासणी पूर्ण झाली ना शिक्षा.
पुढे २००६ साली काँग्रेस सरकारच्याच काळात त्याला फाशी सुनावली गेली.
आणि हेच भाजपावाले अफजलला अजून का शिक्षा दिली नाही, म्हणून काँग्रेसच्या नावाने गळे काढून स्फुंदून स्फुंदून रडत असतात..