समजून घे तू

समजून घे तू सांगणे जमणार नाही
समजून दे तू मागणे जमणार नाही

दर्या असा,होडी अशी,चकवेच तारे
आता किनारी लागणे जमणार नाही

नादी सुखाच्या येव्हढा मी खर्च केला
शिलकीत काही भागणे जमणार नाही

आज्ञेत कोणाच्या तरी हा जन्म गेला
आता मनाने वागणे जमणार नाही

येता अशी ती आमिषे दाही दिशांनी
वाटे मिठाला जागणे जमणार नाही

------------------------- जयन्ता५२