जमेल तितकी हझल अरे मी करून घेतो!

श्री.अ.अ.जोशी यांच्या हझलेवरील हझल
(विडंबनाचे विडंबन)
हझल

जमेल तितकी हझल अरे मी करून घेतो!
हसे जरी जाहले तरी मी हसून घेतो!!

कशास इस्लाह बोलती ते मला न ठावे;
गुरूविना मी किती किती मोहरून घेतो!

कळावयाचे कधी जगाला? हुशार मीही....
म्हणून हझलेमधे मती पाजळून घेतो!

खुशाल गझला दळा तुम्ही रोज रोज तुमच्या;
फुकट इथे मी हळूच हझला दळून घेतो!

गझल कशी, अन् हझल कशी ते न जाणतो मी;
तरी हझलकार मी स्वत:ला म्हणून घेतो!

हसा, रडा, वा जळा, तुम्ही जे करा हवे ते!
मला हवी मी तशी हझल छापवून घेतो!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
  भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
   नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
   फोन नंबर: ९८२२७८४९६१