गझल
स्वप्नात काल माझ्या येऊन कोण गेले?
हुरहूर काळजाला लावून कोण गेले?
हा गंध भोवताली रेंगाळतो कुणाचा?
श्वासात फूल माझ्या पेरून कोण गेले?
कोमेजलो, उमललो, कोणास काय त्याचे?
मी रानफूल! माझ्या जवळून कोण गेले?
काळोख लख्ख दिसतो किरणांत नाहलेला;
येथे विजेप्रमाणे चमकून कोण गेले?
आकाश तारकांचे का वाटते रिकामे?
नाही कुणास कळले निखळून कोण गेले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१