प्रसिद्ध मासिकासाठी लेखन करण्याची इच्छा आहे?

नमस्कार.....

मनोगतमधील सर्व सभासदांना आणि पाहुण्यांसाठी !!

'मनोगत'वर येऊन मला काहीच दिवस झालेत. पण इथले दर्जेदार लेखन पाहून मला मी इथे सभासद असल्याचा खूप आनंद झाला आहे. इथेच मला काही अतिशय प्रतिभावान लेखक मिळतील अशी आशा वाटतीये.

त्यासाठी हे एक अनौपचारीक निमंत्रण !!

महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध मासिकासाठी लेखन करण्यासाठी !!

त्या मासिकासाठी नवीन पिढीतील काही पुरोगामी लेखकांचे साहित्य मिळाले तर मला खूप आनंद होईल.

पण ह्या खुल्या संकेतस्थळावर त्या मासिकाचे नाव लिहिण्याऐवजी मी इच्छुक लेखकांच्या प्रतिसादाची वाट बघेन...

कृपया लवकरात लवकर या 'चर्चा प्रस्तावास' उत्तर द्यावे ही विनंती.