ताऱ्यांनाही दगड होताना पाहिले
अंधाराची लाच घेताना पाहिले
नाते नावालाच उरले होते जरी
नात्याचा आभास जगताना पाहिले
काही किल्ले पादशाहीने जिंकले
बाकीचे गद्दार बनताना पाहिले
तानाजी, बाजी प्रभू , दादोजी तुम्हा
औरंग्याची साथ देताना पाहिले
सूर्याच्या पिल्लांत बेबनाव वाढला
रायगडाला आज खचताना पहिले
इतिहासाला विसरले पुन्हा मावळे
शिवबाच्या आत्म्यास रडताना पाहिले