मजसमोर ध्यानस्थ बैसले
काहीसे शुष्क कागद कोरे
पाउले लेखणीची थकली
बळ पंखात कल्पनांच्या होते
अंतरा मुखड्याशी भांडतो
कडवट जाहला संवाद
वेदना रिक्ततेची पाझरते
अगणित शब्दांचे ओघळ
बळेच गांधारीसम दिसला
टोचतो हा अर्थांतरन्यास
आभास समजल्याचा करते
जगणे कधी न उमजलेले
का तमा बाळगावी तमाची
काव्याची साधना व्हावी
राजहंस ताईत नभांगणाचे
परी बंदी इतरांस नाही