बाराचा शंख फुंकुनिया
दुपार नभी टळटळली
देतोच डांबरी रस्ता
चटक्यांची आतिषबाजी
अवचित गुरकावते तेवी
धिटाई कुण्या वाहनाची
सुगंध मस्तकी शिळावला
लकेर धुळीच्या शेपटीची
चौकात दिवा तांबडा
अवघी वाहतुक थिजली
धावती फुगे इवल्या हाती
पोटाची खळगी भरण्यासी
प्राक्तन प्रौढत्व शैशवाचे
संदर्भ दुःखास नाही
पतंग आकाशी उडते
दिशा आयुष्यासी नाही