पाऊस वेडा !

पाऊस वेडा
दिवस दिवस कोसळत रहातो
तू भिजावीस म्हणून
मोतिया थेंबांनी
तू सजावीस म्हणून


पण तू ?
तू मात्र पाऊस दुरूनच निरख्णारी
थेंबांतून पावलाशी उतरणारा
स्वर्ग नाकरून
दोन पावलं मागे सरकणारी


पाऊस वेडा
आणि तेवढाच वेडा मीही
फरक फक्त इतकाच
तो तुला भिजवू पाहतो पाण्यात
आणि मी प्रेमात
पण दोघेही पराभूत
आणि तू कोरडी ती कोरडीच


फरक पुन्हा इतकाच
टिकला हा कोरडेपणा दूरपर्यंत
तर त्याला जमेलही
रोज रोज त्या ढगात असणं
माझं मात्र नक्की नाही
रोज रोज या जगात असणं