शोभते कां ?

अर्ध्यावरूनी उठून जाणे, शोभते कां ?
जाऊनही साचून रहाणे, शोभते कां ?


तूच दिलेली दिशा धरूनी चालू लागता
दोनच जरी ते अश्रू वहाणे, शोभते कां ?


रोज भेटीची वचने देणे, तरी न येणे
ओळखीचे तेच ते बहाणे, शोभते कां ?


कोडे येण्याचे ना अजूनी सुटले पुरते
जाणे मांडून नवे उखाणे, शोभते कां ?


अंगावरूनी जाणे, जणू न ओळखही
मागे उरती लाख दिवाणे, शोभते कां ?


चेहऱ्यावरी नितळ पाणी, अबोल गाणी
अंतरात बोलके तराणे, शोभते कां ?