पहिली भेट

त्या पहिल्या भेटीतच मोहून मी गेलो
जणू स्वप्न जागेपणी पाहून मी गेलो


उगवला होता तो  चंद्र  पुनवेचा
उन्हात चांदण्याच्या न्हाऊन मी गेलो


सहवास होता चंदनाचा जसा,
डोहात सुगंधाच्या बुडून मी गेलो


काय पाहू आरशात मी आता
प्रतिबिंबात स्वतःच्या दडून मी गेलो


अजय