पूर्ण कलाकार?

काही दिवसापूर्वी एका नामवंत बासरी वादकाने (नावाचा उल्लेख मुद्दामच टाळतो)गायक हे पूर्ण कलाकार नसतात कारण त्याना फक्त गायन वादन यापैकी अर्धाच भाग येत असतो,उलट वादकाला मात्र गायनाचे ज्ञान असतेच शिवाय तो एक वाद्य वाजवतो याशिवाय त्याला तबला वाजविण्याचेही ज्ञान असते.म्हणून तो पूर्ण कलाकार असा वाद निर्माण केल्याचे आठवते.याशिवाय या आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यानी उदाहरण दिले की कोणताही देव पहा उदा‌. सरस्वती - वीणा , कृष्ण-बासरी, शिवाचे गण पखवाज  अशी उदाहरणे देऊन त्यानी वादकाची श्रेणी वरची असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.तो मला पटला नाही आणि मी त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला,पण तो प्रसिद्ध करणे मासिकाच्या संपादकाला प्रशस्त वाटले नाही.आता अनेक मनोगती संगीतात रस घेतात आणि त्याचे रसग्रहणही उत्तम करतात ,त्यामुळे याविषयी त्यानी निर्णय करावा अशी माझी इच्छा असल्याने हा चर्चेचा प्रस्ताव मांडत आहे.