पुनः तो पावसाळा!


तुला आठवतो का तो पावसाळा ?


ज्यात आपल्या छत्र्यांची अदलाबदल झाली होती.


आणि तुझी मोडकी छत्री परत करण्यासाठी


मी तुझ्या घरी आलो होतो.


तू माझी चांगली छत्री  परत केली नाहीसच.


आणि वर मलाच ठेवून घेतलंस..!!


...


मग त्या नंतरचे कित्येक पावसाळे


आपण भिजायला बाहेर पडतो आहे


दोन्ही छत्र्या घरी ठेवून ...!!


(जयन्ता५२)


(ही माझी कविता गेल्या वर्षी  'मनोगत' वर आलेली आहे.)
 ज्यानी वाचली असेल त्यांनी क्षमा करावी.
 ज्यानी वाचली नसेल त्यांनी दाद द्यावी.