का मला मी टाळतो आहे कधीचा?
एवढा का जाच आहे ज़िंदगीचा?
शोध एखादा टिकाऊ रंग आता,
रंग मेंदीचा कुठे त्या लायकीचा ?
पार झाले मोकळे आकाश आणी
रंग अंधारून गेला हिरवळीचा !
उमजले नाही कधी जाळून गेला?
भेटला तो भास होता सावलीचा !
या, बसा ! खेळून घ्या अन. चालते व्हा,
हा न हिंदोळा कुणाच्या मालकीचा!
थांब थोडे एवढी घाई कशाची?
रंग हा ताजाच आहे तेरडीचा!
धुंद वाळ्याचा, सुगंधांच्या झळांचा,
हा उन्हाळा सावलीचा, सायलीचा !
गणेश धामोडकर "शिवश्री"