भूमातेस-(शार्दूलविक्रिडित)

माते हे परके घरात घुसले दस्यु तुझ्या गे कसे?


आधी या परक्यांचिया न घुसले की मीच गेही तसे


होते जो बळ तो परासि लुटणे मी मानिले पाप ते


जाता मद् बळ हाय मजला ते पुण्यचि शापते


माते कां म्हणुनी अहा वद अशी हिंसा तुझी होतसे


हिंस्त्रांचीही न की मनी मम सुता हिंसा करु येतसे


त्राता देव नृसिंह सोडुनी पुजूं गाईसची जाय मी


वाघाच्या पुढती म्हणुनी बनले गायीहुनी गाय मी


तूंते दंशुनि कोण मारक विषे घायाळवी गे अहा


मी दे दूध जयासि घे उलटुनि तो सर्पची दंश हा


स्त्रोत<स्मग्र सावरकर<काव्य विभाग