स्तब्ध

कितीतरी वेळ झाला..
हातात लेखणी धरून स्तब्ध बसल्ये
समोर पसरलेल्या शुभ्र कागदाकडे पहात..
किती शांत.. नितळ दिसतोय..

मी आत्ता इथे असते,
तर प्रतिबिंबसुद्धा पडलं असतं त्यात...