प्रावरणांच्या आवरणाची
झूल मोरपंखी उत्कटते
पाठमोरी पाठ तुझी
पहाटेसही लाजवते
डोईवरली गंगाच जणू
संगमरवरी खेळतसे
बंधने नजाकत रंगितशी
इंद्रधनूलाही लाजवते
डौल असा मद मस्त की
काठावरले कातळही पाझरते
पाहूनी जरतारी नीर गाठीला
वीरशेलाही सुटतसे
मध्यान्हीला, उतारातूनी
नागिणीपरी सळसळते
शीतळांतही सूर्य तप्त असावा
लाव्हा तरंगरेतापरी मुलायमते
संध्येला संगमावरी
दर्यासमवे उसळते
निशाकाली, निःश्वास कोंडूनी
त्रिभुजातुनी आसमंतात कोसळते
विराण्यात कवींच्या
कुंचल्यातही गमते
कीर्ती तुज लावण्याची
अनंत प्रियांस भजते