मी बेअक्कल...!

माणुसघाणी झाली अक्कल...
टाळाटाळीसाठी शक्कल!

भूषण त्यांना वाटे याचे -
"गळ्यात माझ्या आहे बक्कल!"

पहा विचारी माणुस आला...
पुरावा धरा त्याचे टक्कल!!!

जाळु नका मज, मेलो नाही...
ही मुडद्याची होती नक्कल!

मलाच का हे प्रश्न ग्रासती?
खरेच मी आहे बेअक्कल!