पालकाची चटणी

  • अर्धी जुडी स्वच्छ धुवून चिरलेला पालक, अर्धी जुडी धुवून चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा चमचा जिरे, ३ मोठे चमचे दही, चवीनुसार हिरव्या मिरच्या व मीठ
  • ३ चमचे दाण्याचे कुट
१५ मिनिटे
४ ते ६ जणांक्रिता

वरील सर्व जिन्नस एकत्र वाटण यंत्रातुन वाटुन घ्यावे व एका काचेच्या भांड्यात काढुन गरम पराठे किंवा इडली सोबत खाण्यास द्यावी.

वरून हिंगाची फोडणी व साखर आवडत असल्यास टाकावी. आजकाल थीम मेन्यु असतो पालक पराठे, हिरवा पुलाव व हिरवी चटणी  असा ग्रीन मेन्यु  डोळ्याला व जिभेला सुखावणारा करता येईल.  

पुर्णिमा - मैत्रीण