आनंदाची गातो गणी हसता हसता
सांगत असतो प्रेम काहाणी हसता हसता
मनास मझ्या जरी टोचले शब्द कुणाचे
मधुर असते मझी वाणी हसता हसता
खरा मित्र मी हाच मानला होता माझा
दुश्मनास जो देतो पाणी हसता हसता
जारी जिंकला तरी हारतो राजा सारे
निघुन जाते ज्याची राणी हसता हसता
कुणा कळेना कसे सोसले काल दु:ख मी
आज वाचती लोक कहाणी हसता हसता
- -----दर्शन शहा