रक्त वाहे दंगलीचे
रक्त वाहे दंगलीचे,
सांग,'रामा' की 'अलीचे'?
तोडुनी वृक्षास आता,
शोध घेती सावलीचे!
बोहला माझा न झाला,
-दैव माझे करवलीचे
आपुले नाते जसे की,
फूल आणि अंजलीचे (अंजली=ओंजळ)
छेडिता पोळे मधाचे,
दंश झाले मखमलीचे
पावलांनो ध्यान ठेवा,
गाव आहे दलदलीचे
काल सर्वांच्याच ओठी,
नाव एका श्यामलीचे
-मानस६