गझल

वादळी वाऱ्यात होडी लोटली
का मिठी, बाल्या*, तुझी सैलावली ?  (*'बाल्य'चे संबोधन, नाचणारा बाल्या नव्हे)

कालचे अल्लड नयन झुकले जरा
वारुणीला सवत आता लाभली

लावता पेल्यास ओठाला तिने
त्या नशेने द्राक्षकन्या लाजली

कोट ह्रदयाभोवती होता तरी
ती कशी अलगदपणे सामावली

काय सांगू राख कैसा जाहलो
होउनी सौदामिनी ती भेटली