पुण्यात दिनांक २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ दरम्यान होऊ घातलेल्या राष्ट्रीय बंधुता संमेलनाचा भाग म्हणून दिनांक २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मराठी गझलकारांचा मुशायरा आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी कविवर्य प्रदीप निफाडकर असतील.
ह्या मुशायऱ्यात राजेंद्र शहा (पुणे) , संध्या पाटील (कऱ्हाड), अनंत ढवळे (औरंगाबाद) , राजा मिसर (रावेर) , ज्योती बालिगा-राव (वसई), चित्तरंजन भट (पुणे) हे गझलकार सहभागी होतील.
रसिकांनी अधिकाधिक संख्येने आवर्जून उपस्थित राहावे. कार्यक्रम नि:शुल्क असून प्रवेशासाठी निमंत्रणपत्रिकेची अट नाही.