नाचती ही प्रश्नचिन्हे
फेर धरुनी का अशी
ऊरी धडधड, श्वास अवघड
बावरी मी का अशी
जीवनाच्या हर सवाला
सहज उत्तर मी दिले
लाभले जे हसत खेळत
आजवरी स्विकारीले
आज मग का मी निरुत्तर
आज का मी पांगळी
का सुचेना मार्ग काही
आज का मी वेगळी
नियती ना अपराजिता.....
ना सहज मी कधी हारली
खेळ रडीचा जाहला
तेव्हाच नियती जिंकली
हार कधीही मानली ना
आसवे गाळून मी
सावरोनी घाव उरीचे
बाजी हर जिंकेन मी
रडविले मज हर घडी तू
नाही परी मी अंकिता
ताठ आहे ताठ राहीन
मी विजेता, मी विजेता
जयश्री