आली होळी, आली होळी
आली झरररऽची आरोळी
गल्लीमध्ये वाट पाहते
दबा धरुन मित्रांची टोळी
रंग लावता घेते चिमटे..
(काका, काकू नाही भोळी!)
चिंब कुणाचा कुडता झाला
आणि कुणाची साडी चोळी
नका कोकलू असे गळ्यांनो
देतो ना भांगेची गोळी
निघेल बघ एखादी विडी,
नीट झाड ना अपुली झोळी!
भूतनाथ मज दिसतो आहे
याची देही, याची डोळी
आली होळी, गेली होळी
उरली पण पुरणाची पोळी
ओळींवरती नुसत्या ओळी
गझलेची बांधलीय मोळी
------ टीकाराम
प्रेरणास्रोत:
- कुमार जावडेकृत मराठमोळी
- केशवसुमारकृत मराठमोळी-२