हॉर्न.ओके.प्लीज

हॉर्न.ओके.प्लीज अर्थात ट्रकमागचं फाकडू तत्त्वज्ञान आणि मौलिक विचार.

काळजाला अक्षरशः भिडणारे हे मौलिक विचार प्रवासात ट्रकपाठीमागे वाचण्यात आले अन मन पिळवटून निघालं.

ट्रकचालक खरं आयुष्य जगले असं म्हणावसं वाटतंय! हे नमुनेच बघा ना!

        गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी.    ( क्रूर जीवनाचं सारच जणूकाही मांडलंय. हो का नाही?)

        जाता हूं मालिक ,खयाल रखना

       आता हूं खाली होकर , माल तयार रखना.     (जीवन तर चालतच राहणार बाबा)

तुम्हालांही काही ओळी माहित असतीलच की! भरीस भर घालण्याची अपेक्षा!