मनोगतींच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.माझ्या मागील कथेप्रमाणेच ही कथाही पूर्वी प्रसिद्ध झालेली (नागपूरच्या ' जनवाद '२३ जाने.१९९६ च्या अंकात )असूनही त्यावेळी प्रसिद्ध होण्याचा व बक्षीस मिळाल्याचा जो आनंद झाला त्याहून कितीतरी अधिक मनोगतींच्या प्रतिसादामुळे झाला कारण ही जाणकारांची दाद आहे
त्या जागेवर एक उजाड माळ पसरले होते.
"ही काय भानगड ? इथे तर काहीच नाही"डोक्यावर हात मारून घेत विश्वास चित्कारला.त्याचा जणु सगळ्या जगावरचाच विश्वास उडाला होता.आपण स्वप्नात तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी मी विद्याला म्हटले"अग मला चिमटा घे बघू"या संधीचा फायदा घेऊन तिन मला एवढा कचकचित चिमटा काढला की जणु काही चंद्रमोहनला मीच गायब केले होते.मिनीलासुद्धा माझी अवस्था पाहून राहवले नाही आणि ती म्हणालीही " हे ग काय आई, केवढ्या जोराने बाबाना चिमटा काढलास ?"
" तू गप्प बस कार्टे नाही तर तुलाही मिळेल प्रसाद !" विद्या फुत्कारली माझी बायकोविषयक मुक्ताफळे तिने ऐकली होती याची मला खात्री पडली पण त्या चिमट्यामुळे की काय कोण जाणे माझ्या डोक्यात काही तरी चमकले.
" चला घरी ,काय भानगड झाली आहे मला समजल्यासारखे वाटतेय"
"मग इथच सांग की, घरी जाऊन काय डॉ. शुक्राचार्याना फोन लावायचा आहे का?" विश्या करवादला.
" हो तसच काहीस ,चला घरी म्हणजे सांगतो."
घरी जाताच मी तडक संगणकासमोर जाऊन बसलो,आणि मयासुर यांत्रव केंद्राची वेबसाइट उघडली. मला अपेक्षित संदेश त्यावर दिसत होता. " आम्ही जसे तुमच्या जगात आलो तसेच परत फेकले जात आहोत आम्हालाही नकळत, आमच्या यांत्रवांच्याही सोबतच. विश्व बँकेतील तुमच्या पैशाला आम्ही हात लावलेला नाही, तसदीबद्दल क्षमस्व !"
"याचा अर्थ काय ?" मला गदगदा हालवत विश्याने विचारले.
"सरळ आहे पण समजायला आणि पचायला तर त्याहूनही अवघड !"
"ए,उगीच कोड्यात ओलू नकोस,काय असेल ते लवकर सांगून टाक"विश्याच्या सहनशक्तीचा केव्हाच अंत झाला होता..
"ऐक तर मग "श्रीकृष्णानी अर्जुनाला म्हणावे अशा थाटात मी म्हणालो,"आपल्या विश्वासारखीच अनेक विश्वे या अंतराळात आहेत आणि त्या विश्वातही आपल्यासारखीच माणसेही म्हणजे चक्क तू ,मी .विद्या अशी आहेत फक्त त्यांचे संदर्भ वेगळे आहेत आणि प्रगतीचे वेग वेगवेगळे आहेत,अशाच एका आपल्याहून प्रगत विश्वातील काही जण आपल्या विश्वात कसल्याशा धक्क्याने फेकले गेले .कदाचित त्यांच्या विश्वातही मयासुर यांत्रव केंद्राची त्याने जाहिरात केली असेल ,त्यामुळे ती आपल्या विश्वात वावरत असल्यासारखीच येथे वावरली त्यानी आपल्याला कल्पनाही करता येणार नाही असे यांत्रव बनवले "
"आणि अशा पद्धतीने त्यानी आम्हाला बनवले असेच ना?"
"असे नाही म्हणता येणार,त्यानी आपल्या पैशाला हात लावला नाही."
"पण ते गेले कसे?"विद्याला राहवले नाही
"पुन्हा अशाच योगायोगाने ते आपल्या मूळ विश्वात फेकले गेले कसे ते त्यानाही कळले नाही त्यामुळे जाताजाता ते फक्त हा संदेश सोडून जाऊ शकले,तेवधेच ते करू शकत होते."
तिघेही माझ्याकडे भकास मुद्रेने पहात होते. तेवढेच ते करू शकत होते.
या कथेचा शेवट काही मनोगतीनी सुचव्ल्याप्रमाणे बनवेगिरीने करण्याचे मलाही सुचले होते पण मग ती वि.का.न होता गुन्हेगार कथा झाली असती.यातील समांतर विश्वाची कल्पना डॉ. जयंत नारळीकर यानी त्यांच्या 'गंगाधरशास्त्र्यांचे पानिपत' या वि. का. मध्ये वापरली आहे त्या कथेतील गंगाधरशास्त्री रिक्षातून जाताना धक्का बसून अशा विश्वात प्रवेश करतात ज्यात पानिपतची लढाई सदाशिवराव भाऊनी जिंकलेली असते त्यामुळे जे पुणे ते पहातात ते बहुतेक भा.ज.प. च्या अखंड भारताच्या संकल्पनेत बसणारे असते. अशाच प्रकारची कल्पना " जर्नी अक्रॉस थ्री वर्ल्डस ' या अलेक्झांडर आणि सर्गी अब्रॉमोव या पितापुत्रानी लिहिलेल्या रशियन विज्ञान काल्पनिकेत वापरली आहे (१९७३ पूर्वी लिहिलेली)