नायक : | गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी |
नायिका : | वनिवनी |
नायक : | कुमुदिनी |
नायिका : | गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी |
नायिका : प्रिया, काय हे दिसे?
दुष्टपणे भ्रमर तो कशास हसतसे?नायक : कळी लाजे अशी ...
सुंदरी लपावी पदरामधे जशीनायिका : ऋतु असला हा कसला? हा पवन फिरे वनिवनी नायक : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी नायिका : वनिवनी नायक : कुमुदिनी नायिका : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी
नायक : | कुणा काय मी म्हणू? तू नि मीहि हरवलोय काहिसे जणू |
नायिका : | घडे काय, कळेना ... जागल्या मनात सुप्त सुप्त कामना |
नायक : | ऋतु असला हा कसला? हा पवन फिरे वनिवनी |
नायिका : | गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी |
नायक : | वनिवनी |
नायिका : | कुमुदिनी |
नायक : | गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी |
नायिका : जवळ येऊ नको,
कळी कळी म्हणत प्रेम वाढवू नकोनायक : सोंग तू करू नको
भ्रमर म्हणुन नजरबंदि ही करू नकोनायिका : ऋतु असला हा कसला? हा पवन फिरे वनिवनी नायक : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी नायिका : वनिवनी नायक : कुमुदिनी नायिका : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी
चाल :
मूळ गाण्याची चाल जशीच्या तशी ( मात्र आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली. )
३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील )
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)