जाभंळी (डोंगर यात्रा)

नमस्कार,

जुलै महिन्यातले दिवस, लोणावळा परिसर कसा हिरवागार झाला होता, मी आणि प्रसाद ह्या वेळी नवीनं ट्रेक करायचा असा विचार करून लोणावळ्यात पोहोचलो, तसा हा परिसर चांगलाच परिचयाचा असल्यामुळे कोणताहि पर्याय चालणारा होता , राजमाची ,ढाक-बहिरी , तुंग-तिकोना, लोहगड-विसापुर, कोरिगड,तैलबैला इत्यादी.......

पण असेच एकदा वाचनात आले होते कि कोरिगडाच्या अलीकडे तुंगकडे जाताना एक किल्ला वजा डोंगर आहे , त्याच नाव "जाभंळी" (गिर्यारोहकांच्या यादित)....... क्रमश:

ता.क : माझा हा पहिलाच लिहिण्याचा प्रयत्न आहे ,तरी आपण मोठ्या मनाने समजवून घ्याल , भविष्यातील प्रयत्नांसाठी आपल्या प्रतिसादास इच्छुक........

लोनावळ्याहून अंबवण्याची राज्य परिवहन खात्याची गाडी पकडून घुसळगावात (आनंदनिकेतन चौकात) उतरलो. तिथे चौकशी केली ,पण जांभळी बद्दल माहिती असणारे कोणीच सापडेना, मग सरळ तुंग चा रस्ता पकडला आणि गावात जाऊण पाहू असा विचार केला. रस्त्यावर फक्त बिगारी काम करणारे , गावात पोहोचलो (गाव म्हणजे काय ,५ ते ६ झोपड्या ), पण तिथेही तसेच , कोणालाच काहि माहिती नाही, जरास पुढे जाऊण पहाव तर लोक तुंग बद्दल सांगायला लागले , मग काहीतरी गडबड झाली अस वाटलं, आता??????????????

पाणि प्याव म्हणून एका घरात गेलो तिथे असलेल्या अजोबांकडून समजले कि ,समोरचा डोंगर म्हणजेच "जाभंली" आहे ,स्थानिक भाषेत त्याला देविचा डोंगर म्हणतात. दोन डोंगरांच्या कपारीतून वर जाण्यासाठी रस्ता होता , पावसाचे दिवस असल्यामुळे सगळीकडे चिख्खल झाला होता,पाय घसरत होते , दोन्ही डोंगरांच्या मध्ये आल्यावर डाव्या हाताला एक खडी चढण होती, दोन्ही हात आणि पायांचा वापर करुणच चढाव लागत होत,

डोंगराच्या माथ्यावर येताच जे विलोभनिय दृश्य दिसले ते पाहूण आलेला थकवा आणि चिख्खलमय झालेलं शरीर सुखावलं,५०० मीटर अंतर चालून गेल्यावर एका खलग्याला तळ्याच स्वरुप आलेल दिसलं, तिथेच कडेनं शेकडो मेंढ्या चरत होत्या , त्यांचा मालक संभा आणि त्याची आई तिथे होते , चौकशी करता कळाले कि सगळा पावसाळा ते डोंगरावरच काढतात ,मधे आधे गावात जाऊन हवं नको ते पाहतात, पलिकडेच एक पडवि आणि तिला दगडांच कुंपन होतं.

संभाने आमची चौकशी केली व आम्हाला देविच्या दर्शनाला नेह्ण्याची जबाबदारी घेतली.त्याच्या एकंदर बोलण्यावरून आम्हाला एक अंदाज आला की वर्षानूवर्षे इथे कोणि गिर्यारोहणासाठी आलेले नसावे. डोंगरावर तसा वावर फक्त गुरांचा आणि त्यांच्या मालकांचा. कोठेहि पायवाट नावाचा प्रकार नाही. ढोबळ मानाने तो आम्हाला घेउन चालला होता.

आयुष्यात कधिही पाहिले नसतील इतके खेकडे सैरभैर पळत असतना पाहिले , पाय जपूनच टाकावे लागत होते.आमच्या डाव्या बाजूला अजून एक डोंगर होता (म्हणजे आम्हि ज्या डोंगरावर होतो त्याच्याहि वर ) डोंगराला वळसा घालूण आम्हि जवळ जवळ विरुद्ध दीशेला पोहोचलो. तेथे मात्र संभा थांबला व आम्हाला त्याने पायातिल बंदयुक्त वाहना(बूट)काढायला सांगितले. इथल्या प्रथेप्रमाने असाव असं वाटलं , पणं थोड्याच वेळात संभाचा हेतू समजला ," त्या चढावर वितभर पाय चिखलात रोवले जात होते. कसेबसे आम्ही वरपर्यन्त पोहोचलो परंतु देविच्या दर्शनासाठि एक दिव्य करावे लागणार होते ,एक लहानशी घळी एका ढांगेत पार करायची होति ,नाहीतर सरळ चिखलातून खालच्या ओढ्यात...

देविला नैवेद्य ठेउन आम्ही न्याहारी उरकली , तिथे अजून एक माहिती संभाकडुन मिळाली कि त्या डोंगराच्या माथ्यावर अजून एक देवस्थान आहे कि जे नवसाला पावते , परंतु त्या तश्या वातावरणात तिथे जाणे धोकादायक होते त्यामुळे तो पुढच्या "जाभंळी" ट्रेक साठी राखिव ठेउन आम्ही परतिच्या प्रवासाला निघालो.