हॉट दिसण्याची स्पर्धा

         महाराष्ट्र टाईम्स मधला हॉट दिसण्याची स्पर्धा हा लेख वाचला. हि स्पर्धा काहीच उपयोगाची नसली तरी ती अस्तित्वात आहे हे नाकारता येणार नाही.हा लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा. कपड्या पासून सर्वच गोष्टींसाठी चुकीची गरज दाखवून काही जाहिरात कंपनी विशेषता मुलींना आपल्या जाहिरातीच लक्ष बनवतात. १९९४मध्ये ऐश्वर्या रॉयला विश्व सुंदरी बनवण्यामागे भारतीय बाजारपेठ लक्षात घेतली असावी का ? ती सुंदर आहे यात काही प्रश्नच नाही पण त्या स्पर्धेत घडलेल्या त्रुटींमुळे अस वाटत.

         तेव्हा ठेवलेला दुष्टीकोन काही कंपन्यांना आता उपयोगास येतो आहे हे फॅशनच्या नावाखाली खपणाऱ्या सर्वच गोष्टींमुळे दिसून येते.स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी या जाहिरात कंपनी आणि फॅशनच्या नावाखाली आपला माल खपण्यासाठी केलेला अट्टहास या सगळ्यात तरुण आणि आता तर लहान मुले यांना हि लक्ष बनवलं जात आहे यात बेबी सोपं पासून सुरवात झालीच आहे.

मी मनोगतीला विचारू इच्छितो की या लेखावरून आपल्याला काय वाटत आणि मुलगा जन्माला आल्या नंतर ते ३० वयोगटा पर्यंत सर्वांनाच जाहिरात कंपन्यांनी आपलं लक्ष बनवून आपला माल खपवत आहेत या बद्दल काय वाटत.यात काही गोष्टींची गरज वाटली तरी भरपूर गोष्टींचा अतिरेक आढळून येतो.या लेखावरून आणि आजूबाजूच्या परिस्थिती वरून स्वतःची ओळख घडवण्यासाठी जास्त करून मुली चुकीची स्पर्धा करत आहे अस तुम्हाला वाटत का ?