कसे सांगावे?

मी बोलतो कळ्यांशी- देणार कोण ग्वाही!
बागेतल्या कळ्यांनाही सांगणार काही

तो थांबणार नाही, ही लाजणार नाही
बागेतल्या कळ्यांना ही सांगणार काही

येथे वसंत कैसा रुळणार बारमाही?
बागेतल्या कळ्या नाही सांगणार काही

-नीलहंस