गुणगुणत भ्रमर वनात

नायक : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी
नायिका : वनिवनी
नायक : कुमुदिनी
नायिका : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी

नायिका : प्रिया, काय हे दिसे?
दुष्टपणे भ्रमर तो कशास हसतसे?
नायक : कळी लाजे अशी ...
सुंदरी लपावी पदरामधे जशी
नायिका : ऋतु असला हा कसला? हा पवन फिरे वनिवनी
नायक : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी
नायिका : वनिवनी
नायक : कुमुदिनी
नायिका : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी

नायक : कुणा काय मी म्हणू?
तू नि मीहि हरवलोय काहिसे जणू
नायिका : घडे काय, कळेना ...
जागल्या मनात सुप्त सुप्त कामना
नायक : ऋतु असला हा कसला? हा पवन फिरे वनिवनी
नायिका : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी
नायक : वनिवनी
नायिका : कुमुदिनी
नायक : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी

नायिका : जवळ येऊ नको,
कळी कळी म्हणत प्रेम वाढवू नको
नायक : सोंग तू करू नको
भ्रमर म्हणुन नजरबंदि ही करू नको
नायिका : ऋतु असला हा कसला? हा पवन फिरे वनिवनी
नायक : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी
नायिका : वनिवनी
नायक : कुमुदिनी
नायिका : गुणगुणत भ्रमर वनात उमलत बघ कुमुदिनी


चाल :

मूळ गाण्याची चाल जशीच्या तशी ( मात्र आधी गाणे ओळखावे लागेल )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )