कारणे द्या

आपण सगळ्यांनी शालेय जीवनात हा प्रश्न सोडवला असेल. आज हा प्रश्न आठवायचं कारण म्हणजे कधी सुना गर्भार तर गायी गाभण असल्यामुळे साचलेली बोडणं भरायला मामाकडे गेले होते. ह्या दोन गोष्टींचा बोडणाशी काय संबंध ह्याचा विचार करू लागले. बोडणाला दही, दूध, तूप भरपूर प्रमाणात लागतं (माझी एक भाची एकदा सगळं टाकलं की लगेच देवी तृप्त झाली म्हणून सांगते) ते वाया न घालवता सुना व बछड्यांकरिता ठेवावं असं त्यापाठीमागच कारण असावं. माझ्या आईचे बरेच नियम/शास्त्रं होती. सोमवारी न्हायचं नाही, शनिवारी तेल आणायचं नाही.दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.रात्रीचा केर बाहेर फेकायचा नाही, लोणच काढायचं नाही, शिवायच नाही.. पूर्वीचा काळी वीज नव्हती त्याकाळी ते बरोबरच होतं. आपल्या इथे ताट वाढायची एक पद्धत/नियम आहे ती आजही योग्यच आहे. असे अनेक नियम/शास्त्रं व त्यापाठीमागची कारणे लिहा.