माहिती अधिकार वापरणार का?

नमस्कार,

ही चर्चा गद्य विभागातील एका लेखावर आधारीत आहे - 'कचरा कोंडी'.

शहरभर-गावभर कचरा गोळा करणाऱ्या सफाई सैनिकांना सरकारकडून महिन्याला २ लाईफ बॉय साबण, रबरी हातमोजे, गणवेश असे साहित्य दिले जाते. पण असे आढळले आहे की -

१. ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही

२. पोहोचणाऱ्या साधनांची गुणवत्ता एवढी खालच्या दर्जाची असते की २-३ दिवसात हातमोजे फाटून जातात. एवढेच नव्हे, तर गणवेश म्हणजे काय तर खाकी सदरा आणि पायजमा! गटारात उतरून काम करणाऱ्या माणसाला कापडी गणवेश!

या लिखाणाद्वारे मी एक प्रस्ताव मांडू इच्छितो -

आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी माहिती अधिकार कायदा वापरून, वरील सामानाचे गत वर्षीचे वितरण आणि त्याची गुणवत्ता  याविषयीची माहिती मिळवावी.

हा खटाटोप यासाठी की, दिवसेंदिवस या लोकांची परिस्थिती खालावत चालली आहे. पगार नाहीत, निरोगी आयुष्य आणि साधने नाहीत. अशा परिस्थितीत आपण माहिती अधिकार कायदा वापरून ही गोष्ट निदर्शनास तरी आणू शकतो (अर्थातच प्रत्यक्ष कृतीद्वारे अजूनही बरेच काही करण्याजोगे आहे).

यासाठी लागणारी माहिती आणि मदत मी पुरवू शकेन.

... अमितराज (९८५०१४१६७१)