कैलास मानस सरोवर यात्रा

नुकतीच कैलास मानसरोवर यात्रा करुन आलो. खाजगीरित्या म्हणजे एका यात्रा कंपनी तर्फे गेलो होतो. त्यामुळे वैद्यकिय प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती. पण १८००० फुटांवरचा दोल्मा पास हळू हळू चालत का होइना पण पार केला आणि फिट असल्याबद्दल उगचच गुदगुल्या झाल्या. (कारण माझ्यापेक्षा मोठे जाउदे पण जे लहान होते तेही कोणाच्यातरि मदतीने चालत होते आणि माझ्यापेक्षा हळू याचाच थोडा आसूरी आनंद झाला). एकंदर दौरा मस्तच झाला. फक्त एक गोष्ट खटकली. ती म्हणजे चिनी लोक तिबेटचा व्हिसा देतात पण कैलास परिक्रमेत त्याचे अस्तित्व कुठेच जाणवत नाही. कारण त्या भागात तिबेटी लोकांच्या नजरा जरा भीतिदायकच वाटतात. सुदैवाने एक दोन किस्से सोडले तर वाईट घटना घडल्या नाहीत. एकंदर मानसरोवरातील स्नान आणि कैलासाचे प्रथम दर्शन दोन्हीहि अप्रतिम होते.