निशिगंधाची फुले तुझी परिमळली ह्या जीवनामधे
तसे परिमळो प्रेम प्रियावरचे मम प्रेमी मनामधे ॥ध्रु॥
अधिकार प्रियाचा जाणवला स्पंदनी स्पंदनी जसा मला
गुंफली त्यासवे मी गेले तेव्हा कळले हे गुपित मला
किति सुख हे बंधनामधे ॥१॥
नयनांत माझिया क्षणोक्षणी स्वप्ने असती केवळ त्याची
येते मनात मी प्रेमोत्सुक मेघना होउनी रंगांची
वर्षु तया अंगणामधे ॥२॥
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
ध्रु : गागागागा । गागागागा । गागागागा । गागागा
कडवी : मोठ्या ओळी : गा । गागागागा । गागागागा । गागागागा । गागागा
छोट्या ओळी : गागागागा । गागागा
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेला काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.
)
३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील
)
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)