मराठी संगीताची दिशा आणि दशा

सध्या अनेक चॅनल्सवर संगीताच्या स्पर्धा होत आहेत (सारेगमप, इंडियन आयडॉल,वगैरे). यापैकी जे मराठी कार्यक्रम आहेत, त्यातील स्पर्धक जुनी गाणी (आशाताई, स्व. बाबूजी, लावण्या, वगैरे) गातात. त्यातल्या त्यात नवी म्हणायची तर अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, संदिप- सलील यांची ठरावीकच गाणी गातात. हिंदी चित्रपट संगीतात जे प्रयोग होतात तसे प्रयोग आता मराठी चित्रपटात होत नाहीत; आणि त्यामुळेच स्पर्धकही नवी गाणी गाण्यास नाखूश असावेत. दुसरे एक कारण म्हणजे या स्पर्धांसाठी जे परीक्षक येतात त्यांनाही नवी गाणी आवडतातच असे नाही. अर्थातच याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो. हे आता बदलालयला हवे असे वाटते. खरच या मताशी कोणी सहमत आहे का?