मी तर असल्या लाख पर्‍या पाहील्या

मी तर असल्या लाख पर्‍या पाहील्या

मी तर असल्या लाख पर्‍या पाहील्या ।
तुजसी न पाहीली, हो, तुजसी न पाहीली॥धृ॥

उफ ही नजर, उफ ही लकब, कोण न होईल मोहित ।
केस हे की ढग घन, डोळे हे, विद्युल्लता ।
जाणे कुणा कुणावर कोसळे अता ॥१॥

तू सुरेख, ऋतूही सुरेख, मन हे आज काबुत नसे ।
रस्ते हे चिडिचूप कसे, स्पंदने उधाणली।
प्यायल्या वाचून, मला चढे ही नशा ॥२॥

बोलशी न तू जरी, मरून तर न जाईन मी ।
तू परी की अप्सरा, तोरा का तुज एवढा ।
ऐकून पाहा कधी कुणाचे तरी ॥३॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०८१०

मूळ हिंदी गीतकारः साहिर लुधियानवी, संगीतकारः ओंकार प्रसाद नय्यर, गायकः महंमद रफी
चित्रपटः तुमसा नहीं देखा, भूमिकाः शम्मी कपूर, अमिता

(मूळ गाण्याचा नुसता द्यावा. : प्रशासक)