शेव

  • हरबरा डाळीचे पीठ
  • मीठ, पीठ भिजवण्यासाठी लागणारे पाणी
  • तळण्यासाठी तेल
३० मिनिटे
ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात

  

डाळीच्या पीठात चवीपुरते मीठ घालून पीठ सैल भिजवावे. भिजवताना पीठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्यावी.  पीठ भिजले की त्याला थोडा तेलाचा हात लावावा. पीठ नितळ झाले पाहिजे. नंतर कढईत तेल गरम करावे. चकली करण्याच्या सोऱ्यामधे शेव पाडायची चकती घालून आपण जशी कुरडई घालतो त्याप्रमाणे गोलाकार शेव थेट कढईत घालावी. मध्यम आच ठेवावी. शेव कडक झाली का नाही ते झाऱ्याने पडताळून पहावे. शेव कडक झाली की मगच ती झाऱ्याने उलटावी. नंतर २-४ मिनिटांनी ताटलीत काढावी. गार झाली की बारीक करून डब्यात भरून ठेवणे. ही शेव थोडी कडक व कुरकुरीत होते. 

भरपूर प्रमाणात करून ठेवता येते. चहा पिताना अधुन मधुन तोंडात टाकायला ठीक.

सौ आई