...मला आठवण आहे !

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ...तुझी आठवण आहे !

...मला आठवण आहे !
.....................................
 अधी ड्राय डे आणि भरिला हे एकाकीपण आहे
...हाच दिलासा! घरी मित्राच्या खूप साठवण आहे !
मित्राकडे जाण्यास निघालो... प्रवास करतो आहे 
मंद पावले टाकीत पण हा ट्राफिक सरतो आहे
सुरा पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे
दूर वरूनी प्रवास करूनी इथे पोहचलो आहे
भरले प्याले ! भरून प्याले सुरा चाखतो आहे...
अखंड येथे हा मदिरेचा झरा वाहतो आहे
समीप बॉटल घेऊन बसलो नको दुरावा आहे !
थकलो आता ! माझा चालू ग्लास विसावा आहे !!
धूम्रनळीची ज्योत इथे ही कुणी लावली आहे
कशी दिसावी ? सांग मला मग कुठे बाटली आहे ?
                    * * *
...परतीचाही प्रवास आता कसा व्हायचा आहे
कळे न मजला, अधार आता कुणी द्यायचा आहे !
उंबऱ्यात हे पाऊल माझे उगीच अडते आहे
`खरेच` का हे! पाऊल माझे तिरके पडते आहे !
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे
अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे !
                   * * *
...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! 
                     * * *

- केशवसुमार
रचनाकाल ः ०५ ऑक्टोबर २००७