बोलण्याने बोलणे वाढेल आता

बोलण्याने बोलणे वाढेल आता
बोललो नाही तरी चालेल आता


देव सत्संगांमध्ये बंदिस्त झाला,
तो कसा दीनाघरी धावेल आता


हातघाईने पुन्हा भांडून घेऊ,
काय चर्चेन गड्या साधेल आता


या नदीला पार केले पापण्यांनी,
वेदनेचा घाटही लागेल आता


पोरके याहून भीषण दुःख नाही
- कोण मज समजेल, समजावेल आता