बोलायचंय खूप... पण.... शब्दच आटलेत
कधी कधी ह्या कुबड्या सुद्धा अगदीच अधू होतात
आधाराच्या ऐवजी पांगळेपणच देतात
आणि मग चिडचिड होत रहाते आतल्या आत
आतली धुमस, घुसमट बाहेर पडायला हवीये आता
कुठल्याही भावनेला पुरुन उरणारी....!
संवेदनेच्या पलीकडलं काहीतरी आत रुजतंय....... वाढतंय
आणि तटतटून बाहेर यायचा प्रयत्न करतेय
पण कसं येणार बाहेर...
ह्या वांझपणातून कोण सोडवेल आता
कुणा दुर्वासाचा वर.....
की करावा लागणार पुत्रकामेष्टी यज्ञ ...!
जयश्री