खारी

नमस्कार,
     माझ्या लहानपणी (80 चे दशक)मी जेवढ्या खारी पाहिल्या नाहीत, तेवढ्या खारी मला सध्या दिसत आहेत. 
     स्वतच्या घराजवळ व कार्यालयाजवळ दृष्टीस पडत आहेत. शिवाय, घराजवळच्या एका रस्त्यावरही दिसत आहेत. त्या बहुसंख्येने दिसत आहेत, ही विशेष उल्लेखनीय बाब. 
घराजवळ व कार्यालयाजवळ त्या कडधान्ये खाताना दिसतात. एकावेळी सुमारे पाच-सहा असतात. एकावेळी एकच येऊन दाणे टिपून जाते. उर्वरीत खारी जवळपासच असतात. एकीचे टिपणे झाले की दुसरी येते.   
     काही प्रश्न पडले आहेत...
     त्यांचा विणीचा नेमका हंगाम कोणता ?
     प्रमुख खाद्य कोणते ?
     याबाबत मारूती चितमपल्लींच्या एखाद्या पुस्तकात काही माहिती आहे का ?
     
     तज्ज्ञ मनोगतींनी जिज्ञासापूर्ती करावी, अशी विनंती.