प्रसिद्धी...

परिपूर्ण जीवनाची केली अशी समीक्षा..
कोणाकडून कोणी ठेवू नये अपेक्षा..

आहे तुझा जरीही तो सोबती सुखाचा..
पण संकटात होते त्याची खरी परीक्षा...

संपून सर्व गेली दुःखाकडून दुःखे..
माझ्याकडे व्यथेची तो मागतोय भिक्षा..

संपूर्ण सत्य म्हणजे हा एकमेव 'मृत्यू'
मी घेतली म्हणोनी त्याच्याकडून दीक्षा...

'दासी असे प्रसिद्धी निरपेक्ष संयमाची..'
हे सत्य जाणल्याने रुंदावतील कक्षा..

अमित वाघ.
"गुरुमंदिर" सुधीर कॉलनी, अकोला-444001.
मो. नं. : 9850239882.
दुवा क्र. १