शब्दांची वारुणि


शब्दांची वारुणि आज मी ही रिचवत गेले.
ओठातूनी आज मी जणू वेद वदत गेले.

अशी धुंदी चढली मजला,मला न कळले,
वेदांनाही मी सुरात माझ्या सजवत गेले.

मंत्र ऋचा अशा गायल्या मन्मनीच्या,
श्वासांच्या धाग्यात प्राणमौक्तिक मढत गेले.

’मुक्तात्म्यात’ भिनली आता,अशी वेद वाणि,
आत्मा सोडोनी शरीर कोणाच जळत गेले(?)

मुक्ता