दबून अंग चोरून ,चिडीचूप बसलेली ,सगळी क्लेमेंटाईन्स
बॉक्स फुटताक्षणीच
गेली एका पाठोपाठ , वाट फुटेल तिकडे
क्षणभर विसावली, रस्ताभर पसरून..
जसे काही त्यांना सुद्धा
ज्ञात होते की त्यांचा जन्म झाला होता
भरधाव धावणाऱ्या
गाडीखाली सापडून लोळागोळा होण्यासाठी
बॉक्स पडल्याचे भान दुकानदार तर नाहीच
गिऱ्हाईकालाही नव्हते ...
काळ्या रस्त्यावरून फक्त
केशरी आसवे ओघळत होती..