प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ८

महाभारतापासून (१० सप्टेंबर ई.पू.३००८ ग्रेगरीयन) दिवस मोजल्यास कोणतेही सूर्यग्रहण(किंवा चंद्रग्रहण )सिद्ध करता येते.उदा. महाभारतापासून १ ऑगस्ट ई‌. स. २००८ पर्यंत१८३२०१६ दिवस किंवा ६२०३८ चांद्रमास किंवा ५२८५.४७ ग्रहणवर्षे झाली आहेत.पण २४ नोव्हेंबर ई‌. स.२००३ चे सूर्यग्रहण जास्त वैशिष्ट्यपूर्ण होते कारण या दिवशी पण  कार्तिक अमावस्येस व अनुराधा नक्षत्रातच सूर्यग्रहण होते.

महाभारतयुद्धापासून १८३०३०४ दिवसानंतर हे सूर्यग्रहण झाले.या काळात पृथ्वीच्या सूर्याभोवती ५०११.०१२ प्रदक्षिणा झाल्या तर ६१९८० चंद्रसूर्य युती झाल्या.त्यामुळे २४ नोव्हेंबर २००३ रोजी सूर्यचंद्र २१७ अंशावर होते.(महाभारतकाळी २१३.३३ वर होते.)

मात्र या काळात ६९.६ अंशाचे अयनचलन झाले आहे.व ०.०१२ प्रदक्षिणा जास्त झालीआहे.त्यामुळे तारखेत ७५ दिवसांचा फरक आहे.मजेची गोष्ट अशी की ई. स. २००३ च्या तिथ्या ई.पू. ३००८ प्रमाणेच आहे.फरक तारखेत आहे तसेच ई‌. स. २००३ साली अधिकमास नव्हता.त्यामुळे १८ डिसेंबर ई.पू. ३००८ रोजी माघ शु. ८ व रोहिणी नक्षत्र होते तर २८ फेब्रुवारी ई. स. २००४ रोजी फाल्गुन शु.८ व रोहिणी नक्षत्र होते.