सावल्यांचे कोवळे मृगजळही
हसते देउन भासांचा दाखला
कधी सत्य, तर कधी कल्पित
भासतो चांदण्यांचा काफ़ला
अंधारातही मी एकलाच हींडतो
सखे, शाप हा माझ्या पथाला
तुझ्यात गुंतलो, तेव्हाच चकलो
अद्याप शोधितो मी स्वत:ला
सखे, गीत हे घायाळ माझे
निजतो घेउन मी उशाला
सुन्न या माझ्या चांदरातीला
देतेस तु ही हाक कशाला?
सखे, मोजण्या लक्तरे माझी
आजही बघ्यांचा गाव आला
सात्वंनेच्या डोळ्यात आजही
का कोरडाच गं भाव आला?
मी न कधी टाकीन खाली
तुझ्या स्वरांचा हा रिक्त प्याला
भले उद्या सोडावयास लागु दे
मज अधीर श्वासांची मधुशाला
–सचिन काकडे[फ़ेबृवारी २०,२००७]
फ़क्त तुझ्यासाठीच “हा खेळ सावल्यांचा”