कन्नमवार नगर (विक्रोळी ,पुर्व) मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कनमवार नगर, विक्रोळी येथील सभेत उत्तर भारतीयांविरोधात जे विधान केले . व त्यांची अटक आणि सुटका तेथील न्यायालयात झाली . त्यामुळे अचानक कन्नमवार नगर चे नाव सगळीकडे झाले.
तर अशा कन्नमवार नगर ,विक्रोळी येथील भागाविषयी आम्हाला मिळालेली माहीती.
मध्य रेल्वेच्या विक्रोळी (पुर्व )या उपनगरापासून अवघ्या १५ मिनिटांवर कन्नमवार नगर आहे. महापालीकेच्या 'एस ' विभागात हा प्रभाग येतो. प्रभागाचा क्रमांक आहे ११२.साधारण ६० ,७० च्या दशकात वसलेली अशी ही म्हाडाची वसाहत . या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी म्हाडाची आदर्श वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे. एकुण २६५ इमारती ,प्रत्येक इमारतीला स्वतंत्र नंबर, एक कामगार कल्यांण मंडळ, महानगर पालिकेचे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, विकास हायस्कूल शाळा समुह, मुलिंचे अस्मिता महाविधालय, पोलीस स्टेशन ,बस इ. सेवा या विभागात येतात. एक अस्सल मराठमोळी मध्यमवर्गी वसाहत म्हणजेच कन्नमवारनगर असे आपण म्हणू शकतो.
खेळाचे गोलाकार असे छत्रपती संभाजी मैदान हे तर येथील वैशिष्ट्ये आहे. तेथील कट्टे व म्युझिकल जॉगिंग ट्रॅक सकाळी (पहाटे पासूनच आणि संध्याकाळी हाऊसफुल असतात. वृध्द मंडळीचे प्रभात मित्र मंडळ तर तेथे प्रसिध्द आहे. अजुन खेळाचे मैदान म्हणजे हुतात्मा रविंद्र म्हात्रे मैदान तेथील उत्कर्ष व्यायामशाळा दहीहंडी, शरीरसौष्ठव स्पर्धा ,उत्कर्ष व्याख्यानमाला या करीता प्रसिध्द आहे. या विभागात बस क्रं ३९४,३९७ (कन्नमवार नगर ते विक्रोळी स्टेशन(पुर्व), ३५४ (कन्नमवार नगर ते शिवाजी पार्क), ३८८ (कन्नमवार नगर ते पोयसर आगार),
१८५ (कन्नमवार नगर ते मजास आगार) या शिवाय पुर्वद्रुतगती मार्गावरून ३६८ (शिवडी,मुलुंड(पुर्व)),३७३(वांद्रे स्टेशन (प) ते वैशाली नगर (मुलुंड,प.),३५३ (वडाळा आगार,टागोर नगर ५ ) या बेस्टच्या बससेवा उअपलब्ध आहेत.
या विभागात अजिबात रहदारी नाही. सर्वत्र हिरवीगार झाडे नजरेस पडतात. या विभागाला लागूनच पुर्वद्रुतगती मार्ग आहे. येथे फक्त राहण्यासाठीच वसाहत आहे . व्यापारी संकुल् नाहीत.
लोकशाहीर विठ्ठल उमप,संगितकार विठ्ठल शिंदे, माजी महापौर दत्ता दळवी, नाट्यनिर्माते दिग्ददर्शक जनार्दन लवंगारे, खासदार एकनाथ गायकवाड, जेष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे, प.म. राऊत सर(मुख्याधापक विकास हायस्कूल शाळा समुह),साहित्यीक वामनराव होवाळ, इत्यादी मान्यवर व्यक्ती येथे राहतात.
सर्वात आधी काँग्रेसचा बालेकिल्ला हा विभाग होता. अलकाताई देसाई नगतसेवक म्हणुन सतत येथून निवडून येत होत्या. अचानक वारे पालटले (साधारण ९० च्या दशकात)आणि शिवसेनचा बालेकील्ला म्हणुन कन्नमवारनगर नावारुपाला आले त्यामुळे नगरसेवक दत्त्ता दळवी यांना महापौर पदाचा मान मिळाला. पण मागिल मनपा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश सांगळे येथुन विजयी झाले. आता हा विभाग मनसेचा बालेकिल्ला होण्याच्या मार्गावर आहे.

पण या म्हाडावसाहतीत पुर्नविकासाचे वारे वाहू लागले आणि येथील वातावरण पलटत आहे. एक अस्सल मराठमोळी वसाहत नष्ट होणार की काय अशी भिती वाटायला लागलेली आहे. विकासक येथे येत आहेत आणि येथील रहीवाशांना उंच ,उंच टॉवर ची स्वप्न दाखवत आहेत. काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे .आतापर्यंत येथील ५ इमारती विकासकाच्या(बिल्डर हो) ताब्यात गेल्या आहेत.

आपण एकदा याच कन्नमवार नगर पाहून

आपला
कॉ.विकि