'पेव फुटणे' याची (आश्चर्यकारक) व्युत्पत्ती !!!

नुकतीच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. उद्यानाच्या परिसरात फिरताना ठिकठिकाणी मोठ्या फलकांवर उद्यानातल्या निरनिराळ्या वनस्पतींबद्दल माहिती लिहिलेली होती. त्यांपैकी एका फलकाकडे गाडीतून जाता-जाता ओझरतं लक्ष गेलं. त्या फलकावर 'पेव' या वनस्पतीबद्दल माहिती होती आणि पहिलं वाक्यच असं होतं :

                    'पेव फुटणे' हा वाक्प्रचार या वनस्पतीवरूनच मराठी भाषेत रूढ झालेला आहे.

खरं सांगायचं तर 'पेव' अशी काही वनस्पती असते हे मला तोपर्यंत माहितीच नव्हतं. पण त्यापेक्षाही, या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती पाहून मला आश्चर्य वाटलं. त्याबद्दल फार थोड्या जणांना माहिती असणार.

तो संपूर्ण माहिती-फलक काही मला वाचता आला नाही.  तर, याबद्दल कुणाला काही अतिरिक्त माहिती आहे का? असल्यास जरूर सांगावी. कारण अश्या प्रकारच्या व्युत्पत्तींबद्दल जाणून घ्यायला मला फार आवडतं.